शेतात पाणी नाही, विजेचा प्रश्न गंभीर असून सतत निसर्गाचा कोप सुरू असल्याने नुकसान सहन करावे लागत असल्याच्या व्यथा पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासमोर शेतकर्यांनी मांडून मदतीची अपेक्षा केली. ...
अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या मुंबई, ठाणे आणि औरंगाबादच्या अधिकार्यांचा समावेश असलेल्या पथकांनी मंगळवारी आणि बुधवारी जिल्हा सहकारी दूध संघासह १६ डेअरींवर धाडी टाकल्या. ...
समुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले. ...
पोलीस अधिकार्यांना त्रास देण्यासाठी १२ आमदारांना बदनामीकारक नोटीस पाठविल्याप्रकरणी पोलीस कर्मचा-याला एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
नपाच्या अग्नीशमन विभागासाठी आलेला ३८ लाखांचा निधी मनपाच्या अधिकार्यांनी आधीच्या निधीचे विनियोगपत्र वारंवार सूचना देऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर न केल्याने हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. ...
शिरपूर मार्गावर असलेल्या टोल नाक्यावर एसटी बसेसला ५0 टक्के सवलत मिळविण्यात विभाग नियंत्रकांना यश आले आहे. राज्यस्तरावर हा लाभ मिळावा म्हणून वरिष्ठ स्तरावरूनही चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
शहरातील मोठा मारुती मंदिर आणि संजय टाऊन हॉल चौकात गतिरोधक नसल्याने भरधाव वेगातील वाहनधारकांमुळे अपघात होत आहेत. यासाठी येथे गतिरोधक बसविण्याची आवश्यकता आहे. ...