जळगाव : दुचाकी घसरुन दादा नामदेव भील (४६, रा. गणपूर, ता. चोपडा) हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी गणपूरनजीक झाला. या अपघातात भील यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले हे सहकारी अधिकारी व कर्मचार्यांसह हुडकोत दाखल झाले. जमावाची आक्रमकता पाहून त्यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, ...
जळगाव : १२ व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील चोपडा शहरातील मान्यताप्राप्त विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी शासनातर्फे दीड कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. ...
जळगाव : महापालिकेतील ठराव क्रमांक १३५ व गाळयांसंदर्भातील चार वेगवेगळ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर राज्य सरकारतर्फे सोमवारी आपले म्हणणे सादर करण्यात आले. याचिकाकर्त्यांना आपलेे म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाने १३ एप्रिल ही तार ...
जळगाव- जिल्हाभरातील ४४ शाळांना डिजीटल शिक्षणासंबंधी प्रोजेक्टर वितरण करण्यात येणार होते. तशी यादी संबंधित गटशिक्षणाधिकार्यांनी तयार करून ती वरिष्ठ कार्यालयास पाठविली होती. परंतु ही यादी जि.प.सदस्यांच्या आक्षेपानुसार रद्द करण्यात आली आहे. आता सदस्यां ...
जळगाव : कन्नड घाटातील रिपीटर पॉइंटवर १७ मार्च रोजी झालेल्या दंगलीतील संशयित आरोपी विकारखान मुख्तारखान याला न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी व शर्थींसह जामीन मंजूर केला. ...
जळगाव- जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचार्यांनी सोमवारी दुपारी जि.प.समोर विविध मागण्यांसाठी निदर्शने केेली. जि.प.कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वामध्ये ही निदर्शने करण्यात आली. अंशदायी पेंशन योजना रद्द करा, जुनी पेंशन योजना लागू करा, सातव्या वेतन आयोगातील ...