ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
जेसीआय ही सर्वांगीण नेतृत्व घडविणारी संस्था असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले आहे. ...
लगडाआंबा कंपार्टमेंट नंबर १२२ वनक्षेत्रात वनविभागाने ५० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड जप्त केले. रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...
यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वंदे मातरम गृप, हेल्थ इज वेल्थ व विविध संघटनांतर्फे देहदान, अवयवदान व महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यात २०७ बाटल्या रक्तसंचय करण्यात आला. ...
ग.स.सोसायटील कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या मुलास दहाव्या दिवशीच सेवेत घेऊन ग.स. सोसायटीने कुटुंबाला आधार दिला आहे. ...