रेल्वेतून पडून पाचोरा तहसीलचे शिपाई गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:35 IST2019-02-10T23:34:55+5:302019-02-10T23:35:14+5:30
अपघात

रेल्वेतून पडून पाचोरा तहसीलचे शिपाई गंभीर
पाचोरा : पाचोरा तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेले अनिल जंजाळ हे रेल्वे अपघात गंभीर जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनिल जंजाळ यांचा पाचोरा रेल्वे स्थानकावर भुसावळकडून येणाऱ्या रेल्वेतून उतरताना अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेतील अनिल जंजाळ यांना रेल्वे पोलीस ईश्वर बोरुडे आणि रुग्णवाहिका चालक बबलू मराठे यांनी तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. रक्तस्त्राव अधिक होत असल्यामुळे तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार बी. ए. कापसे यांनी भेट देऊन विचारपूस केली. जंजाळ यांच्यावर डॉ. सागर गरुड, डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. संदीप इंगळे यांनी श्सत्रक्रिया केली असून जंजाळ मृत्यूशी झुंज देत आहेत.