पाचोरा तहसील कार्यालय बनले कोरोनाचे हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 10:57 PM2020-09-15T22:57:55+5:302020-09-15T22:58:03+5:30

नऊ कर्मचारी बाधित : तहसील कार्यालयाचे कामकाज झाले ठप्प

Pachora tehsil office became the hotspot of Corona | पाचोरा तहसील कार्यालय बनले कोरोनाचे हॉटस्पॉट

पाचोरा तहसील कार्यालय बनले कोरोनाचे हॉटस्पॉट

Next

पाचोरा : तालुक्यात कोरोणाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तालुक्याचे मुख्य ठिकाण असलल्या तहसील कार्यालयातील महसूलचे नऊ कर्मचारी नायब तहसीलदार कोरोना बाधित झाल्याने तहसील कार्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. पाचोरा तहसील कार्यालयचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कामकाज वगळता इतर कोणत्याही कामासाठी तहसील कार्यालय आवारात गर्दी करू नये असे आवाहन पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे. पाचोरा तालुक्यात बाधितांची संख्या दिवसगणिक वाढत असून आजपावेतो अधिकृतरीत्या १२५० रुग्ण संख्या झाली आहे. पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संभाजी पाटील हे यापूर्वीच कोरोना बाधित झाले असून संपर्कातील महसूल कर्मचाऱ्यांची चाचणी घेतली असता ९ कर्मचारी बाधित निघाले. अद्याप काही जणांचे अहवाल येणे बाकी असून तलाठी व क्लार्क यांचा यात समावेश आहे यामुळे नागरिकांनी स्वत: काळजी घेऊन तहसील आवारात फिरू नये असे आवाहन केले आहे. दरम्यान संजय गांधी नायब तहसीलदार बी. डी. पाटील हेदेखील बाधित झाले असून निराधार वृद्ध अपंग महिला व पुरुषांनी देखील कार्यालयाकडे येऊ नये तहसील कार्यालयाचे कामकाज २५ सप्टेंबर पर्यंत अत्यावश्यक वगळता थांबविले असल्याचे तहसीलदार चावडे यांनी सांगितले.

Web Title: Pachora tehsil office became the hotspot of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.