पाचोरा तालुका वकील संघाची कार्यकारिणी घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 21:44 IST2019-01-06T21:42:35+5:302019-01-06T21:44:13+5:30

पाचोरा तालुका वकील संघाची कार्यकारिणी नुकतीच घोषित झाली असून, पदाधिकाºयांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Pachora Taluka advocates team executive declared | पाचोरा तालुका वकील संघाची कार्यकारिणी घोषित

पाचोरा तालुका वकील संघाची कार्यकारिणी घोषित

ठळक मुद्देसर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोधअध्यक्षपदी अ‍ॅड. प्रवीण पाटील

पाचोरा, जि.जळगाव :  पाचोरा तालुका वकील संघाची कार्यकारिणी नुकतीच घोषित झाली असून, पदाधिकाºयांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी अ‍ॅड.प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड.अविनाश सुतार, तर सचिवपदी अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
पाचोरा तालुका वकील संघाच्या सन २०१९ साठी नूतन कार्यकारिणीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. लायब्ररी सचिवपदी अ‍ॅड. कैलास सोनवणे, कार्यकारिणी सदस्य म्हणून अ‍ॅड. आर.के. येवले, अ‍ॅड.बी.जी. महाजन, अ‍ॅड. त्रिशीला लोंढे, अ‍ॅड.कल्पना खेडकर, अ‍ॅड.नीता जगताप यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. एम. बी. मराठा यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Pachora Taluka advocates team executive declared