माजी विद्यार्थी मेळावा
जळगाव : इकरा शिक्षण संस्थेच्या एच. जे. थीम महाविद्यालयात विद्यार्थी मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी डॉ. अब्दूल करीम सालार होते. यासह संस्थेचे सचिव एजाज मलिक, डॉ. अमानुल्ला शाह, अल्हाज बालीवाला, गनी मेमन, अजीज सालार, डॉ. जबिउल्ला शाह, तारिक शेख, अब्दूल रऊफ उपस्थित होते. सूत्रसंचालनक मिर्झा इक्बाल यांनी केले. प्रा.डॉ.चांदखा यांनी रुपरेषा मांडली. उपप्राचार्य प्रा.पिंजारी, सय्यद अल्ताफ अली, प्रा. आसिफ खान, ॲड. शरीफ, एजाजोद्दीन कबिरोद्दीन यांनी मार्गदर्शन केले.
हरितसेनेतर्फे वृक्षारोपण
जळगाव : अलफैज उर्दू हायस्कूल येथे राष्ट्रीय हरीत सेना विभागाच्या वतीने ओझोन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. चेअरमन मुश्ताक सालार यांच्याहस्ते हे वृक्षारोपण झाले. यावेळी मुन्नवर सुलताना, असिम पिंजारी, शेख तौफीक, शेख नवाब, जाहीद खान, वकार शेख, आयशा खान, शाहीन कुरेशी, शेख समरीन, जुबेर खान, जमील खान, शेख रिजवा, अजहर खान, अकिला शेख, कमरुलीसा शेख यांनी परिश्रम घेतले.
नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन
जळगाव : ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय आणि गुरूवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय एकपात्री नाट्यछटा स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. त्यात समृद्धी सचिन भास्कर या तिसरीच्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला. यासह ६ वीची विद्यार्थिनी चांदणी आकाश सूयर्वंशी हिने द्वितीय क्रमांक मिळविला. यावेळी सारिका भास्कर, जे. डी. ठाकरे, चंद्रप्रभा सूर्यवंशी, नरेंद्र वारके, राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी यांनी विचार मांडले.