ओझरला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:03 IST2019-02-28T00:03:02+5:302019-02-28T00:03:26+5:30

कर्जाला कंटाळून राहते घरी आत्महत्या

Ozhar is a farmer suicidal debtor | ओझरला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

ओझरला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

जामनेर : ओझर बुद्रुक, ता.जामनेर येथील तरुण शेतकरी समाधान शंकर चौधरी (वय ३८) याने कर्जाला कंटाळून राहते घरी आत्महत्या केली. शासनाच्या कर्जमाफी योजनेचा आॅनलाईन अर्ज भरुनदेखील लाभ न मिळाल्याने तो विकास संस्थेकडून घेतलेले कर्ज फेडू शकला नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. समाधान चौधरीकडे ८ एकर कोरडवाहू शेती आहे. वडील व आई दोघेही मयत असून कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, २ मुले आहेत. यंदा कमी पावसामुळे हंगाम हातातून गेल्याने समाधान निराश झाला होता. विकास सोसायटीचे सव्वा लाखाचे कर्ज डोक्यावर असल्याने त्याने नैराश्यातून जीवन संपविल्याचे सांगण्यात आले. अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Ozhar is a farmer suicidal debtor

टॅग्स :Jalgaonजळगाव