मोहाडी महिला रुग्णालयात ऑक्सिजन पाइपलाइनची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:36+5:302021-04-13T04:14:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येबरोबर ऑक्सिजनची मागणीही वाढत असल्यामुळे मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयात ७५ ...

Oxygen pipeline facility at Mohadi Women's Hospital | मोहाडी महिला रुग्णालयात ऑक्सिजन पाइपलाइनची सुविधा

मोहाडी महिला रुग्णालयात ऑक्सिजन पाइपलाइनची सुविधा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येबरोबर ऑक्सिजनची मागणीही वाढत असल्यामुळे मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयात ७५ रुग्णांसाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने देणगीदारांच्या सहकार्यातून चार लाख रुपये खर्चाची ऑक्सिजन पाइपलाइनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याबाबतचे पत्रक अध्यक्ष तुषार चित्ते व मेडिकल कमिटीअध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

वर्षभरात रोटरी वेस्टने अमळनेर, बोदवड, भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी ३० बेड्ससाठी तर इकरा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे ५० बेडसाठी ऑक्सिजन पाइपलाइनची व्यवस्था करून दिली होती. मोहाडी येथील ७५ रुग्णांच्या सुविधेमुळे ही संख्या २१५पेक्षा अधिक झाली आहे.

अनेक रुग्णांना होणार लाभ

मोहाडी रुग्णालयात या सुविधेचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अध्यक्ष तुषार चित्ते, मानद सचिव केकल पटेल, प्रकल्प प्रमुख डॉ.राजेश पाटील, सहप्रकल्प प्रमुख चंद्रकांत सतरा, माजी अध्यक्ष गनी मेमन, विनोद बियाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

Web Title: Oxygen pipeline facility at Mohadi Women's Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.