हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:06 IST2019-07-27T12:25:18+5:302019-07-27T13:06:03+5:30
जळगाव : मध्यप्रदेशात झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. ...

हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडले
जळगाव : मध्यप्रदेशात झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आला आहे.
अनेक दिवसांच्या दडीनंतर व असह्य अशा उकाड्यात दिलासा देत पावसाने जळगाव शहरात दुपारी हजेरी लावली होती़ अर्धा तास मुसळधार तर काही वेळ रिमझीम पाऊस झाला़ दुपारनंतर दिवसभर ढगाळ वातावारण होते़ त्यानंतरही रात्रभर झालेल्या पावसाने सर्वांना दिलासा मिळाल आहे.
शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली़ काही काळ मुसळधार तर काही काळ रिमझीम असा दुपारी चार वाजेपर्यंत थांबून थांबून पाऊस सुरू होता़ तसेच रात्री साडे नऊच्या सुमारासही पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते़ दुपारी आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत तारांबळ उडाली होती़ यासह रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांचीही तारांबळ उडाली होती़ दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून प्रचंड उकाडा जाणवत असून शहरवासीय घामाघूम झालेले होते़ त्यातच पावसाने हजेरी लावली होती़ दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारवा असल्याने या उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला होता़ रिमझीम पावसाने पिकेही तग धरतील मात्र, आणखी मुसळधार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे़
रिमझीम पावसातही बत्तीगुल
रात्री साडे नऊ वाजता पावसाला सुरूवात झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला होता़ रात्री उशीरापर्यंत हा वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता़ त्यामुळे शुल्लक पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कारभारावरही नाराजी व्यक्त करण्यात येत होती़
नशिराबादला आठवडे बाजारात तारांबळ
नशिराबाद : अचानक आलेल्या पावसामुळे शुक्रवारच्या आठवडे बाजारात सर्वांचीच एकच तारांबळ उडाली.पावसाने दुपारी काही वेळ चांगलीच हजेरी दिली.त्यामुळे दिलासा मिळाला असला तरी विक्रेते व ग्राहकांची मात्र एकच धावपळ झाली. शुक्रवारी येथे आठवडे बाजार भरतो. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी काही प्रमाणात हलक्या सरी होत्या. दुपारी मात्र पाऊस दिलासा दायक बरसला. त्यामुळे बाजारात सर्वत्र चिखल व पाणी पाणीच झाले होते.