सकारात्मक विचारांतून जीवनातील संकटांना मात द्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:01+5:302021-08-19T04:22:01+5:30
लोेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : माणसाच्या जीवनात त्याचे वागणे, बोलणे, राहणीमान याला खूप महत्त्व आहे. त्यावरून त्याचा ...

सकारात्मक विचारांतून जीवनातील संकटांना मात द्या...
लोेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माणसाच्या जीवनात त्याचे वागणे, बोलणे, राहणीमान याला खूप महत्त्व आहे. त्यावरून त्याचा प्रभाव पडत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक संकटे येतात. संकटाला न घाबरता, न डगमगता त्यावर मात कशी करता येईल, याचा सकारात्मक विचार माणसाला दिशादर्शक ठरत असतो, असे प्रतिपादन समुपदेशक तथा संवादक गिरीश कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव जिल्हा यांच्या वतीने, सदैव सैनिका पुढेच जायचे... या कार्यक्रमाचे शानबाग सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर बिडवे होते. व्यासपीठावर महिला प्रदेश अध्यक्षा भारती सोनवणे, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता गवळी, मनोहर खोंडे, सुधाकर सणांसे, चंद्रकांत शिंदे, प्रशांत बाणाईत, नीलम सोनवणे, रवींद्र शिरसाठ, गणेश सोनवणे, मुकुंद धजेकर आदी उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका प्रशासनातर्फे घेण्यात आल्या. या ग्रामपंचायत निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील नाभिक समाजबांधव, भगिनी विजयी झाले. या विजयी ग्रा.प. सरपंच, उपसरपंचांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये नीलम सोनवणे, सुनीता सोनवणे, ज्ञानेश्वर खोंडे, कविता सनांसे, सोनाली श्रीखंडे, भीमराव चित्ते, जगदीश निमकर, ज्ञानेश्वर ठाकरे, गोपाळराव आमोदे, तर भाजपा ओबीसी मोर्चा महिला प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड झाल्याबद्दल भारती सोनवणे, मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी संजय वाघ, कुणाल गालफाडे, साक्षी सापकर, राजेंद्र डापसे, गणेश टोंगे, सचिन मालवेकर, जयंत महाले, दिशा सैदाणे, श्रीराम पर्वते तसेच किशोर वाघ, उदय पवार, सुयोग निकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र खोरखडे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कुमार सिरामे, संजय सोनवणे, योगेश वाघ, अरुण श्रीखंडे, भीकन बोरसे, राजकुमार गवळी आदींनी परिश्रम घेतले.