अमळनेरातील स्मशानभूमीतून अस्थींची चोरी

By Admin | Updated: June 4, 2017 12:05 IST2017-06-04T12:05:42+5:302017-06-04T12:05:42+5:30

नातेवाईकांचे स्मशानमभूतीत ठिय्या आंदोलन

Osteopathic theft from ammonium graveyard | अमळनेरातील स्मशानभूमीतून अस्थींची चोरी

अमळनेरातील स्मशानभूमीतून अस्थींची चोरी

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि. 4 : स्मशानभूमीतून  अस्थि चोरीस गेल्याने, मयत महिलेच्या नातेवाईकांनी आज सकाळी चोपडा रोडवरील स्मशानभूमीतच ठिय्या मांडला होता.
मीनाक्षी नंदकुमार मालुसरे यांच्यावर 3 रोजी सकाळी 11  वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  सायंकाळी नातेवाईकांनी प्रेत व्यवस्थित जळाले की नाही हे तपासले असता अस्थी व्यवस्थित होत्या.मात्र रविवारी सकाळी मुलगा प्रशांत मालुसरे  व नातेवाईक अस्थी घेण्यासाठी आले असता अस्थी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. त्यामुळे  विधी खोळंबला. अखेरीस नातेवाईक आणि महिलांनी स्मशानभूमीतच  ठिय्या आंदोलन सुरू केले.  पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली. महिलांच्या प्रेताच्या अस्थी नेहमीच चोरी जात असल्याचे समजते महिलांचे कानातले , नाकातले आणि पायातील जोडवे चोरण्यासाठी या अस्थी भुरटे  चोर नेत असल्याचे समजते. नगरपालिकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी होत आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील, भटुसिंग तोमर यांनी पाहणी केली. दोन संशयितांची नावे समोर आली आहेत.

Web Title: Osteopathic theft from ammonium graveyard