विवेकानंद प्रतिष्ठानच्या निवासी वसतिगृहात योगाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:40+5:302021-01-08T04:46:40+5:30
लायन्स क्लबतर्फे आचल पवारचा सत्कार जळगाव : लायन्स क्लब ऑफ जळगावतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नूतन मराठा महाविद्यालयातील मायक्रो ...

विवेकानंद प्रतिष्ठानच्या निवासी वसतिगृहात योगाचे आयोजन
लायन्स क्लबतर्फे आचल पवारचा सत्कार
जळगाव : लायन्स क्लब ऑफ जळगावतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नूतन मराठा महाविद्यालयातील मायक्रो बायोलॉजीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या आचल संतोष पवार हिचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मायक्रो बायोलॉजीचे महेश्वरी गोवर्धन पाटील व जी.एच. कांकरिया यांनी तिचा सत्कार केला.
तबलावादन स्पर्धेत योगेंद्र पाटील यांचे यश
जळगाव : नांदेड येथील रहिवासी व सध्या जळगाव येथे राहणाऱ्या योगेंद्र चंद्रकांत पाटील यांनी शासनाच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय युवा महोत्सव स्पर्धेत तबलावादन स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या फेरीत नाशिक विभागातूनही प्रथम क्रमांकाने विजयी होऊन, तिसऱ्या राज्यस्तरीय फेरीत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. नांदेड माध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक चंद्रकांत पाटील व नांदेड येथील जिप कन्याशाळेच्या शिक्षिका संगीता असोदेकर यांचा तो चिरंजीव आहे.
सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
जळगाव : सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आई जिजाऊमाता, रमाई फाउंडेशनतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शमीम. बी. पठाण, रूपाली पवार, सोनाली सपकाळे, मनीषा पाटील, यमुना सपकाळे, मीरा सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शाळेतील हजेरी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव : कोरोनाच्या संक्रमणामुळे पाचवी ते आठवीसाठी शासनाचे कुठलेही आदेश नसताना बहुतांश शाळेतील शिक्षकांना शंभर टक्के उपस्थिती सक्तीची केली जात आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर आदेश काढून शाळा प्रशासनाला ते निर्गमित करावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.