मजुरांची भूक भागविण्यासाठी सरसावताहेत पहूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 15:47 IST2020-04-03T15:47:21+5:302020-04-03T15:47:39+5:30

मजुरांची भूक भागविण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत.

In order to satisfy the appetite of the laborers, the pathakur | मजुरांची भूक भागविण्यासाठी सरसावताहेत पहूरकर

मजुरांची भूक भागविण्यासाठी सरसावताहेत पहूरकर

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : हातावर पोट भरणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याने त्यांची भूक भागविण्यासाठी पेठ गावातील अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत.
पेठ गावांतर्गत असलेल्या म्हाडा भाग व नवी सांगवीतील मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपामारीची वेळ आली आहे. यासाठी विजय पंढरी पाटील, ज्ञानेश्वर कुमावत, ज्ञानेश्वर देशमुख, संजय आस्कर, गजानन सावळे, धोंडू देशमुख, रवींद्र सुभाष पाटील, स्वप्नील देशमुख, रोहित देशमुख, रमण लोढा, सुनील बारी, रमेश बारी यांनी शंभर ते सव्वाशे मजुरांना खिचडी वाटप केली. तसेच पेठ सोसायटीचे कर्मचारी रवींद्र घोलप व नाना तेली यांच्यासह मित्रांनी खिचडी वाटप केली आहे.

 

Web Title: In order to satisfy the appetite of the laborers, the pathakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.