शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

माजी राष्ट्रपतीच्या भावास खून प्रकरणात आरोपी करण्याचा आदेश

By admin | Updated: July 8, 2014 10:36 IST

काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा.व्ही.जी. पाटील खून खटल्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे कनिष्ठ बंधू डॉ.जी.एन. पाटील यांना आरोपी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

न्यायालयाचे आदेश : आरोपींची संख्या आता सहा, दोघांचे पत्ते मागवले, १0 रोजी सुनावणी

जळगाव : काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा.व्ही.जी. पाटील खून खटल्यात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे कनिष्ठ बंधू डॉ.जी.एन. पाटील यांनाही आरोपी करण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण आदेश जळगावचे अतिरिक्त सत्र न्या.डी.जे. शेगोकार यांनी ७ रोजी सायंकाळी दिला. 
आदेशाची प्रमाणित प्रत १-२ दिवसात उपलब्ध होईल. त्यात प्रथमदर्शनी कोणता पुरावा न्यायासनाने ग्राह्य धरला, हे कळू शकणार आहे. पुढील सुनावणी १0 जुलैला होणार आहे. डॉ.उल्हास पाटील व डॉ.जी.एन. पाटील या दोघांचे पत्ते व वय याबाबतचा तपशील फिर्यादी प्रा.रजनी पाटील यांनी न्यायालयाला सादर करायचा आहे. परिणामी साडेआठ वर्षापासून प्रलंबित खटल्याच्या कामकाजाला गती येण्याची शक्यता आहे. आधीच्या चारपैकी एक आरोपी राजू माळी हा कारागृहात असताना मरण पावला आहे तर दुसरा आरोपी राजू सोनवणे हा कारागृहात आहे. अन्य दोघा आरोपींमध्ये दामोदर लोखंडे, लीलाधर नारखेडे यांचा समावेश आहे. न्यायालयात लोखंडे व नारखेडे यांच्यासह त्यांचे वकील अँड.एस.के.कौल, रजनी पाटील यांचे सुपुत्र प्रणव पाटील, अँड. सुदर्शन साळुंखे (औरंगाबाद), सी.बी.आय.चे अँड. निखिल कुलकर्णी (जळगाव) न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, प्रा.रजनी पाटील तसेच डॉ.उल्हास पाटील व डॉ.जी.एन. पाटील यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही..
२१ सप्टेंबर २00५ पासूनचा लढा
- राजकीय वैमनस्यापोटी कट रचून २१ सप्टेंबर २00५ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गालगत मानराज पार्कसमोर हेल्मेटधारी आरोपींनी तलवारीने हल्ला करुन प्रा.व्ही.जी. पाटील यांचा खून केल्याचा आरोप आहे.
- न्यायालयाच्या आदेशामुळे आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२ (खून) व १२0 ब (कट रचणे) आदीनुसार हा गुन्हा दाखल आहे.
- सुरुवातीपासूनच प्रा.रजनी पाटील यांनी डॉ.उल्हास पाटील व डॉ.जी.एन. पाटील यांना आरोपी करण्याची मागणी केली होती.
- या मागणीसाठी त्यांनी १९ डिसेंबर २00९ रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
- राजू सोनवणे याने अटकेनंतर पोलीस उपअधीक्षक शांताराम गायकवाड यांना डॉ.उल्हास पाटील व डॉ.जी.एन. पाटील यांचे घर दाखवले होते.
- आतापर्यंत या खटल्यात सरकारपक्षातर्फे रजनी पाटील, श्रीधर चौधरींसह ४६ साक्षीदार तपासण्यात आले आहेत.
 
आदेशाची प्रत अद्याप हाती पडलेली नाही. बहुधा ९ रोजी ती मिळेल. त्यानंतरच सीबीआय खंडपीठात दाद मागायची काय?..ते ठरवू. -अँड.निखिल कुलकर्णी, सीबीआयचे वकील
 
सी.बी.आय.सह अनेक पक्ष खंडपीठात दाद मागतील, असे वाटते. त्यामुळे आरोपी राजू सोनवणेच्या दृष्टीने न्याय मिळायला विलंब होणार आहे. अन्य चौघांवर दोषारोप ठेवला जायचा आहे. -अँड.एस.के.कौल