जळगावात बालिका खून प्रकरणी आदेश बाबाच्या घराची झडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:52 PM2018-06-16T12:52:39+5:302018-06-16T12:52:39+5:30

घटनेविषयी शेजारच्यांची केली विचारपूस

Order of Baba's house in Jalgaon murder case orders | जळगावात बालिका खून प्रकरणी आदेश बाबाच्या घराची झडती

जळगावात बालिका खून प्रकरणी आदेश बाबाच्या घराची झडती

Next

जळगाव : समता नगरातील धामणवाडा भागातील आठ वर्षीय बालिकेच्या खून प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून शुक्रवारी रामानंदनगर पोलिसांकडून संशयित आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेश बाबा याच्या घराची झडली घेण्यात आली़ तोच शेजारी राहणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यात येऊन जाबजबाब नोंदविण्यात आले़
रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब रोहम, डिबी कर्मचारी प्रदिप चौधरी, गोपाल चौधरी तसेच इतर पोलीस कर्मचाºयांनी घटनेच्या तिसºया दिवशी शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पुन्हा घटनास्थळ गाठले़ त्या ठिकाणी काही सुगावा मिळेल म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला़ परंतू, काहीही मिळून आले नाही़ त्यानंतर पोलिसांनी आदेशबाबा याच्या घराची झडती घेतली़
पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी बालिकेच्या कुटुंबियांची तसेच आजू-बाजू राहणाºया महिलांना बोलवून त्यांना घटनेबाबत विचारपूस केली़ दरम्यान, बालिकेच्या नातेवाईक महिलेने घटनेच्या एक दिवसाअगोदरची संपूर्ण दिवसभरात घडलेल्या बालिकेच्या हालचाली माहिती दिली़ त्यानंतर पोलिसांनी शेजारीपाजारी राहणाºयांना घटेनबाबत विचारणाकरून चौकशी केली़
मैदानावर खेळताना दिसली होती...
पोलिसांनी बालिकेच्या मैत्रीणीस बोलवून काही माहिती आहे का? अशी विचारणा केली़ त्यावर तीने घटनेच्या एक दिवसाअगोदर आम्ही सोबतच खेळलो़
दुपारी ती दुकानावर आली होती़ मात्र, आई रागावल्यामुळे ती देखील रागात होती़ त्यानंतर तिला आईने घरी बोलविल्यावर मी तीला तुला आई बोलवते आहे असे सुध्दा सांगितले़ शेवटी सायंकाळी ती मोकळ्या जागेत मला खेळताना दिसून आली, अशी माहिती बालिकेच्या मैत्रीणीने पोलिसांना दिली़
अश्रू झाले अनावर
पोलिसांना माहिती दिल्यानंतर बालिकेच्या मैत्रीणीस अश्रु अनावर झाले़ तीने हंबरडा फोडत तिची आठवण येत असल्याचे पोलिसांना सांगितले़
दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण परिसराची माहिती घेत तपासाला वेग दिला आहे़
आदेशबाबाकडून गुन्ह्याची कबुली नाही
समतानगरातील धामणवाडा भागातील टेकडीवर बुधवारी खून व अत्याचार झालेल्या आठवर्षीय बालिकेचा मृतदेह गोणपाटात आढळुन आल्यानंतर खळबळ उडाली होती़ दरम्यान, घटनेच्या दुसºया दिवशी पोलिसांनी संशयित आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेश बाबा यास धानोरा शिवारातील गिरणा नदीपात्रानजीकहून अटक करण्यात आली़ त्याची पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी कसून चौकशी करून सुध्दा त्याने गुन्ह्याची कबूली दिली नाही़
आदेश बाबा जिल्हा रूग्णालयात
खूनातील संशयित आदेश बाबा यास गुरूवारी अटक झाली़ त्यास शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते़ परंतू, आदेश बाबा याच्या हाताला दुखापत झाली असल्यामुळे त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात पोलिसांच्या निगराणीत उपचारार्थ दाखल करण्यात आले़ त्यामुळे शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले नसल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांनी दिली़

Web Title: Order of Baba's house in Jalgaon murder case orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.