विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यांसाठी शिक्षकांवर सक्ती करण्याच्या आदेशाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:18+5:302021-07-02T04:12:18+5:30
कोरोनाची परिस्थिती असताना एकीकडे शाळा बंद आहेत तर विद्यार्थ्यांची शाळाच बँकेत भरणार आहे. विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास याची जबाबदारी कोण ...

विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यांसाठी शिक्षकांवर सक्ती करण्याच्या आदेशाला विरोध
कोरोनाची परिस्थिती असताना एकीकडे शाळा बंद आहेत तर विद्यार्थ्यांची शाळाच बँकेत भरणार आहे. विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार? विद्यार्थ्यांचे झिरो बॅलेन्सवर खाते उघडणे अपेक्षित असताना शासनाने बँकांशी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केलेला नाही. पालकांना खाते उघडण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. एवढ्या कमी कालावधीत लाखो विद्यार्थ्यांचे खाते कसे उघडणार? एका दिवसात बँकेत २० ते २५ खाते उघडले जातात. खाते उघडण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे फोटो, बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्ड लिंकिंग या गोष्टी करणे सोपे नसताना शासनाच्या या आदेशावरच महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने राज्य उपाध्यक्ष अशोक मदाने, जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील व महासंघाचे पदाधिकारी यांनी प्रश्नचिन्ह केले आहे.
कोट करणे
हा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी राज्याचे प्राथमिक विभागाचे संचालक द. गो. जगताप यांना महासंघाने निवेदन दिले आहे. विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवाशी खेळ न करता तत्काळ हा आदेश स्थगित व्हावा
हेमंतकुमार बी. पाटील
जिल्हाध्यक्ष
खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ, जळगाव