गेट अवेअरनेसवर ऑनलाइन वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST2021-06-25T04:13:17+5:302021-06-25T04:13:17+5:30
न्हावी, ता. यावल : फैजपूर येथील जे.टी. महाजन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये गेट अवेअरनेस या विषयावर ऑनलाइन वेबिनार घेण्यात आला. ...

गेट अवेअरनेसवर ऑनलाइन वेबिनार
न्हावी, ता. यावल : फैजपूर येथील जे.टी. महाजन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये गेट अवेअरनेस या विषयावर ऑनलाइन वेबिनार घेण्यात आला. हा वेबिनार गेट आयटूई इम्पेरियल इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक परेश गुगले यांच्या उपस्थितीत झाला. आयोजन प्रामुख्याने महाविद्यालयातील सर्व शाखांचे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी केले. ह्या वेबिनारला महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. यात गेट परीक्षेचे महत्त्व व परीक्षेचा पॅटर्न, नियम, सिलॅबसची सर्व माहिती सांगितली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विविध क्षेत्रात होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या वेबिनारच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.डी.पाटील, अकॅडमिक डीन डॉ. पी.एम. महाजन, सर्व विभाग प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी डॉ.जी.ई. चौधरी, प्रा.ए.बी. नेहेते, प्रा.एम.जी. भंडारी यांनी प्रयत्न केले.