नशिराबाद प्राथमिक विद्यालयात ऑनलाईन शिक्षक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:30+5:302021-09-07T04:21:30+5:30
नशिराबाद : येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा झाला. यात स्पर्धेत बालवाडीपासून ते चौथीपर्यंतच्या ...

नशिराबाद प्राथमिक विद्यालयात ऑनलाईन शिक्षक दिन
नशिराबाद : येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा झाला. यात स्पर्धेत बालवाडीपासून ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाची वेशभूषा करून ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देऊन त्याचा व्हिडिओ शाळेतील ग्रुपवर पाठविला. तसेच माझा आवडता शिक्षक विषयावर भाषण दिले. यात मंदार वाणी, वैष्णवी मुळे, प्रणव पवार, ऋषिकेश श्रावगी, भावेश काळे, सार्थक सावळे, लिना चौधरी, दर्शन पाटील, समर्थ भावसार, पूर्वा दिघे, हर्षिता चौधरी व लावण्या वाणी या विद्यार्थ्यांनी शिक्षक, तर रेवती साळुंखे हिने मुख्याध्यापक, तर पूर्वा दिघे हिने उपमुख्याध्यापकाची भूमिका बजावली. स्वाती रोटे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक प्रवीण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन वैशाली भोळे व पूजा पाटील यांनी केले.