जळगाव बसस्थानकावर मोबाईल चोरणा-याला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:59 IST2018-03-12T22:59:00+5:302018-03-12T22:59:00+5:30
ब्लेड मारुन बसमधील प्रवाशाच्या खिशातून २४ हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविल्याच्या गुन्ह्यात शेख सईद शेख युनुस (वय २८ रा.भुसावळ) याला न्या.निलिमा पाटील यांच्या न्यायालयाने सोमवारी १ वर्ष सश्रम कारावास व सहाशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

जळगाव बसस्थानकावर मोबाईल चोरणा-याला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
ठळक मुद्दे जळगाव न्यायालयाचा निकालचार जणांच्या झाल्या साक्षी२०१४ मध्ये घडली होती घटना
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : ब्लेड मारुन बसमधील प्रवाशाच्या खिशातून २४ हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविल्याच्या गुन्ह्यात शेख सईद शेख युनुस (वय २८ रा.भुसावळ) याला न्या.निलिमा पाटील यांच्या न्यायालयाने सोमवारी १ वर्ष सश्रम कारावास व सहाशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. १६ जुलै २०१७ रोजी नवीन बसस्थानकावर ही घटना घडली होती. निखील यशवंतराव निकम या तरुणाच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. यात चार जणांच्या साक्षी घेण्यात आल्या.फिर्यादी निखील व तपासाधिकारी जितेंद्र राजपूत यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारतर्फे अॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले.