जळगाव जिल्ह्यात कु-हाडीने हल्ला करणा-याला एक वर्ष सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:10 IST2018-03-13T21:10:19+5:302018-03-13T21:10:19+5:30
घराचे सांडपाणी अंगणात येते याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन प्रदीप ज्ञानेश्वर कोळी यांच्यावर कुºहाडीने वार करणाºया रघुनाथ कोळी (रा.कडगाव, ता.जळगाव) याला न्यायालयाने मंगळवारी एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

जळगाव जिल्ह्यात कु-हाडीने हल्ला करणा-याला एक वर्ष सश्रम कारावास
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १३ : घराचे सांडपाणी अंगणात येते याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन प्रदीप ज्ञानेश्वर कोळी यांच्यावर कु-हाडीने वार करणा-या रघुनाथ कोळी (रा.कडगाव, ता.जळगाव) याला न्यायालयाने मंगळवारी एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात चंद्रभागा कोळी व किरण कोळी या दोघांना दोषमुक्त करण्यात आले. १५ मे २०१२ रोजी कडगाव येथे ही घटना घडली होती.याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला तिघांविरुध्द कलम ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. न्या.निलिमा पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात पाच जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकारपक्षातर्फेअॅड.आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.