ढाब्यावर एकाला तिघांकडून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 21:14 IST2019-11-03T21:13:47+5:302019-11-03T21:14:31+5:30
तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल

ढाब्यावर एकाला तिघांकडून बेदम मारहाण
जळगाव : जेवणाच्या आर्डर देण्याच्या कारणावरुन समाधान राजेंद्र गडवे (२२, रा.कौतिक नगर) या तरुणाला तिघांनी लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ढाब्यावर शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी विजय घोडेवाल व अन्य दोन अशा तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान व विजय घोडेवाल असे शनिवारी रात्री साडे बारा वाजता कमलेश ढाबा येथे जेवणासाठी गेले होते. समाधान गडवे याने वेटरला बोलावून जेवणाची आॅर्डर दिली त्याचवेळी विजय घोडेवाल याने आॅर्डर दिली होती. दरम्यान जेवणाच्या आर्डरवरून दोघांमध्ये वाद झाला. यात समाधान गडवे याला विजय घोडेवाल आणि इतर दोघांनी बेदम मारहाण केली त्यानंतर लोखंडी आसारीने मारहाण करून जबर जखमी केले. गुन्ह्याचा तपास अतुल पाटील करीत आहे.