शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मोटारसायकलच्या धडकेत एक वारकरी ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 22:38 IST

रावेर जवळील घटना : काल्याच्या कीर्तनाला जातानाची दुर्घटना

रावेर : बक्षीपूर येथे काल्याच्या कीर्तनासाठी पायी जात असलेल्या दोघा वारकऱ्यांंना मोटरसायकलने धक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. हा अपघात गुरुवारी २० रोजी सकाळी ११ च्या दरम्यान झाला.याबाबत वृत्त असे की, येथील महात्मा फुले चौकातील भजनी मंडळातील दोन्ही वारकरी बक्षीपूर येथील श्रीमद् भागवत कथा सप्ताहातील सांगता समारंभातील काल्याच्या कीर्तनासह महाप्रसादासाठी पायी जात असताना मागून येणाºया मोटारसायकलस्वाराने (एमपी ६८ /एमएफ ६९४२) जबर धडक दिल्याने दोन्ही गंभीर जखमी झाले. यापैकी तुळशीराम सोमा महाजन (वय ८१) यांचेवर रावेर ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला तर दुसरे जखमी वसंत रूपचंद महाजन (वय ७३) यांचेवर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात बादखेडा, ता. शाहपूर येथील अल्पवयीन मोटारसायकल चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही जखमींपैकी तुळशीराम सोमा महाजन (वय ८१) यांच्या मे़ेंदूला गंंभीर दुखापत होवून अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना अंबिका व्यायाम शाळेच्या रूग्णवाहिकेतून रावेर ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मुकाडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र यश आले नाही. तुळशीराम महाजन यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.ते कैलास व सुनील महाजन यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.