बांधकाम साहित्य गच्चीवर पडल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST2021-09-18T04:17:48+5:302021-09-18T04:17:48+5:30
जळगाव : बांधकाम साहित्य गच्चीवर पडल्याच्या कारणावरुन एकाने लाकडी दांडक्याने महेंद्र विश्राम सैंदाणे (रा.के.सी.नगर) यांना बेदम मारहाण करीत ...

बांधकाम साहित्य गच्चीवर पडल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण
जळगाव : बांधकाम साहित्य गच्चीवर पडल्याच्या कारणावरुन एकाने लाकडी दांडक्याने महेंद्र विश्राम सैंदाणे (रा.के.सी.नगर) यांना बेदम मारहाण करीत जखमी केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी गुरूवारी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असोदा रोडवरील के.सी नगरातील महेंद्र विश्राम सैंदाणे यांच्या घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम सुरु आहे. त्यांच्या शेजारी राहणारे दिनकर पांडुरंग कोळी यांच्या गच्चीवर १ सप्टेंबर रोजी बांधकामाचे साहित्य पडले. त्यावेळी दिनकर यांच्या पत्नी गच्चीवर आल्या व त्यांनी मजुरांना व महेंद्र यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. महेंद्र यांनी त्यांना मी तुमच्या गच्चीवर पडलेले सर्व बांधकाम साहित्य साफ करुन देईल असे म्हटले असता, दिनकर कोळी व शोभाबाई यांनी तु आमच्या गच्चीवर कस काय आला असे म्हणत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर दिनकर कोळी यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडुक्याने महेंद्र यांना मारहाण केली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.