जेलमधील दोन आरोपींची बाहेर येत एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:27 PM2019-06-15T12:27:42+5:302019-06-15T12:32:01+5:30

डांबून ठेवले : पोलिसासह तीन जणांविरुद्ध गुन्हा

One out of two accused in the jail is beaten up | जेलमधील दोन आरोपींची बाहेर येत एकाला मारहाण

जेलमधील दोन आरोपींची बाहेर येत एकाला मारहाण

googlenewsNext

जळगाव : जिल्हा कारागृहात असलेल्या दोन आरोपींनी बाहेर येत अरूण भिमराव गोसावी (४३, रा. तुकाराम वाडी) याला मारहाण करीत चारचाकी वाहनात डांबून ठेवले आणि एवढेच नाही तर जिल्हा कारागृहाजवळ नेऊन सोडून दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी एका पोलिसासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे (रा. गणेशवाडी), गोलू उर्फ लखन दिलीप मराठे (रा़ शिवाजीनगर) व पोलीस बाबा (पूर्ण नाव माहित नाही) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अरूण गोसावी हे तुकारामवाडीत कुटूंबासह वास्तव्यास आहेत़ गुरूवारी रात्री ९़४० वाजेच्या सुमारास परिसरातील रिंगा अपार्टमेंटजवळ ते मित्रांसोबत उभे होते़ त्यावेळी चेतन हा गोलू व बाबा पोलीस यांच्यासह या चारचाकी (क्र.एमएच़१९़सीयू़ ८५००) वाहनातून तिथे आला. समोरच्या अपार्टमेंटमध्ये माझे सासू-सासरे राहतात, तुमची इथे उभे राहण्याची हिंमत कशी काय झाली असे धमकावत गोसावी यांना चारचाकी वाहनात डांबून वरील तीन जणांनी बेदम मारहाण केली. तिघांनी गोसावी यांना जबरदस्तीने चारचाकीमध्ये डांबून मारहाण केली़ त्यानंतर चारचाकी जिल्हा कारागृहाच्या दिशेने नेऊन तेथे देखील गोसावी यांना मारहाण केली व मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाजवळ गोसावी यांना सोडून तिघांनी पोबारा केला़ शुक्रवारी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी रात्री घडलेला संपूर्ण प्रकार हा पोलिसांना सांगितला़ त्यानंतर मारहाण करणाऱ्या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन जणांैपकी एक पोलीस
दरम्यान, या तीन जणांमधील बाबा हा पोलीस कर्मचारी असल्याचे गोसावी यांनी सांगितले आहे़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासासाठी पोलीस पथक
या प्रकाराची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी तातडीने एक तपास पथक नेमले. पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, मनोज सुरवाडे, विजय पाटील, सचिन पाटील, मुदस्सर काझी यांचा या पथकात समावेश असून या पथकाने शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली.
आरोपी बाहेर आला कसा
या मारहाणीच्या घटनेतील आरोपी चेतन आळंदे उर्फ चिंग्या, गोलु उर्फ लखन दिलीप मराठे हे खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. ते जेलमध्ये असताना बाहेर येणे हा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही अशा काही घटना येथे घडल्या आहेत.

Web Title: One out of two accused in the jail is beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.