एक लाखाची सिगारेट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 05:00 IST2017-12-30T05:00:42+5:302017-12-30T05:00:46+5:30

विदेशी बनावटीची एक लाख १६ हजार रुपये किमतीची सिगारेट जप्त करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाचोरा येथे घडली.

One lakh cigarette seized | एक लाखाची सिगारेट जप्त

एक लाखाची सिगारेट जप्त

पाचोरा (जि. जळगाव) : विदेशी बनावटीची एक लाख १६ हजार रुपये किमतीची सिगारेट जप्त करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाचोरा येथे घडली. या प्रकरणी दुकानदार मुरलीधर हरसुलमल पंजाबी (५०) यास अटक करण्यात आली आहे. शहरात बनावट सिगारेट विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने कंपनीच्या भरारी पथकाने पाचोरा पोलिसांच्या मदतीने शहरातील पान-मसाला दुकानांची तपासणी केली.

Web Title: One lakh cigarette seized