ट्रकच्या धडकेने एक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 20:45 IST2020-04-16T20:44:57+5:302020-04-16T20:45:12+5:30
बोहर्डी : रस्ता ओलांताना घडला अपघात

ट्रकच्या धडकेने एक जागीच ठार
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथून जवळच असलेल्या बोहर्डी गावाजवळील एच.एस. फिवेल पेट्रोल पंपासमोर महामार्ग ओलांडतांना समोरून येणाऱ्या ट्रकने आयशर वाहनाने धडक दिल्याने मध्ये प्रदेशमधील एक जण जागीच ठार झाला. ही घटना बुधवार रात्री ८ . ३० वाजेच्या सुमारास घडली . अज्ञात ट्रकचालकाविरुध्द याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्ये प्रदेशमधील तिलीया येथील रहिवाशी व वाहन चालक म्हणून काम करणारा राज भोहर भारत कोल ( ३५ ) हा गेल्या चार पाच दिवसापासून मुंबई येथे होता. त्याच्या गावाकडील वाहनात बसून तो आला असता बोहर्डी गावाजवळील एच. एस . फिवेल पेट्रोल पंपावर ते थांबले होते . यावेळी राज भोहर भारत कोल हा शौचाल्यासाठी महामार्ग ओंलांडत असतांना लाल रंगाच्या ट्रकवरील अज्ञात चालक याने त्यास धडक मारून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. अपघाता नंतर तो वाहन न थांबता पळून गेला. अनिल कुमार इंधलाल सौधिया वाहनचालक रा. तिलीया मध्ये प्रदेश यांच्या फिर्यादीवरून अज्ञार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरसींग चव्हाण तपास करीत आहे .