बोदवड चौफुलीजवळ कंटेनरची ट्रकला धडक एक ठार, चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 19:43 IST2018-09-28T19:29:53+5:302018-09-28T19:43:50+5:30
आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर बोदवड चौफुलीच्या पुढे मलकापूर इंडियन गॅस गोडाऊनच्या समोर कंटेनरने समोरून ट्रकला दिलेल्या धडकेत कंटेनरचालक जागीच ठार झाला

बोदवड चौफुलीजवळ कंटेनरची ट्रकला धडक एक ठार, चार जखमी
मुक्ताईनगर : आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर बोदवड चौफुलीच्या पुढे मलकापूर इंडियन गॅस गोडाऊनच्या समोर कंटेनरने समोरून ट्रकला दिलेल्या धडकेत कंटेनरचालक जागीच ठार झाला असून, कंटेनर व ट्रकमधील चार जण जखमी झाले
फिर्याद पो.काँ.विनोद आत्माराम श्रीनाथ यांनी दिलेली आहे. त्यानुसार, कंटेनर (क्रमांक आरजे-४७-सी-६५४१) वरील चालक रविकुमार रमेशचंद्र राजपूत (रा.नोगामा, राजस्थान) याने ट्रक (क्रमांक डब्लूबी-३३-सी-६३१३) ला समोरून धडक दिली. या घटनेत कंटेनरचालक रविकुमार हा जागीच ठार झाला. कंटेनरमधील अजितकुमार राजपूत, हुकुमसिंग राजपूत तसेच अमरेंद्र धनंजय बाग, तोतल गोलक खामराई दोन्ही राहणार पश्चिम बंगाल हे जखमी झाले आहेत. तपास पो.कॉ.श्रावण जवरे करीत आहेत.