गणेशपूर पिंप्रीजवळ अपघातात १ जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:38 IST2020-06-08T15:37:50+5:302020-06-08T15:38:14+5:30
बांधकाम सुरू असलेल्या मोरीवर आदळून एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला.

गणेशपूर पिंप्रीजवळ अपघातात १ जण ठार
गणेशपूर, ता.चाळीसगाव : बांधकाम सुरू असलेल्या मोरीवर आदळून एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ७ रोजी रात्री आठला गणेशपूर-पिंप्री गावाजवळ ही घटना घडली. निंबा गुलाब भिल (वय ४५, रा.मांदुर्णे, ता.चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.
निंबा भिल हे आपल्या नातेवाईककांकडे आलेले होते. रात्री परत जात असताना बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी कोणताही फलक लावलेला नव्हता. यामुळे रात्रीच्या अंधारात अंदाज आला नाही. परिणामी त्यांची दुचाकी बांधकामावर जोरात आदळली. जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बांधकाम संथ गतीने
दरम्यान, मोरीचे काम अतिशय संथ गतीने होत आहे. संबंधित या कामावर कधीही येत नाही. तक्रारीची दखल घेत नाही. या कामाविषयी पिंप्री बुद्रूकचे माजी सरपंच संजय देवरे यांनी तक्रार करूनही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही, अशी व्यथा आहे. यावरून ठेकेदार व अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा आरोप देवरे यांनी केला आहे.