One died after falling into a well at Lon in Amalner taluka | अमळनेर तालुक्यातील लोण येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू

अमळनेर तालुक्यातील लोण येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू
अमळनेर : तालुक्यातील लोण पंचम येथील नारायण यशवंत पाटील (वय ५५) यांचा २५ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला.
नारायण पाटील यांनी २५ रोजी सकाळी विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणायला गेले बराच वेळ झाला परत आले नाही. योगीराज न्हावी यांनी त्यांच्या कुटुंबाला कळवले की, नारायण पाटील हे गावाबाहेरील ग्रामपंचायतीच्या विहिरीवर पाय घसरून पडले. गावातील अनिल पाटील व तुषार पाटील यांनी विहिरीत उतरून नारायण पाटील यांचे शव बाहेर काढले. विनोद पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास रोहिदास जाधव व सचिन निकम करीत आहेत.

Web Title: One died after falling into a well at Lon in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.