राज्यातील १९४ आमदारांना एक कोटींचा बंपर धमाका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 17:42 IST2023-03-25T17:42:12+5:302023-03-25T17:42:23+5:30
या निकषाच्या आधारावर राज्यातील १०४ विधानसभा सदस्य पात्र ठरले असून त्यांना एक कोटींचा निधी पावला आहे.

राज्यातील १९४ आमदारांना एक कोटींचा बंपर धमाका!
कुंदन पाटील
जळगाव : प्राप्त निधीपैकी ५० टक्के खर्च झालेल्या व प्रशासकीय मान्यता ८० टक्के असलेल्या मतदारसंघांनाच एक कोटींचा वाढीव निधी वितरीत केला आहे. या निकषाच्या आधारावर राज्यातील १०४ विधानसभा सदस्य पात्र ठरले असून त्यांना एक कोटींचा निधी पावला आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून विधानमंडळ सदस्यांना ५ कोटींचा निधी दिला जाणार होता. तत्पूर्वी प्रत्येकी चार कोटींचा निधी यापूर्वीच वाटप झाला आहे. वाढीव एक कोटींचा निधी वाटप करण्यासाठी वित्त विभागाने निकषात बसणाऱ्या आमदारांचा लेखाजोखा तातडीने मागविला होता. त्यानुसार २४ मार्च रोजी राज्यातील १९४ आमदारांना प्रत्येक १ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.
जिल्हानिहाय पात्र आमदारांची संख्या कंसात : मुंबई शहर (१०), मुंबई उपनगर (२६), ठाणे (१८), पालघर (६), रायगड (२), रत्नागिरी (२), सिंधुदुर्ग (२), नाशिक (१४), धुळे (२), नंदुरबार (२), जळगाव (११), अहमदनगर (९), पुणे (२), सातारा (८), सांगली (८), सोलापूर (११), कोल्हापूर (५), छत्रपती संभाजीनगर (८), जालना (३), बीड (१), परभणी (३), हिंगोली (४), धाराशिव (४), लातूर (१), बुलडाणा (२), अकोला (२), वाशिम (०), अमरावती (५), यवतमाळ (१), नागपूर (७), वर्धा (४), भंडारा (२), गोंदिया (२), चंद्रपूर (३), गडचिरोली (१).