चाळीसगावला खदानीत एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 16:41 IST2020-07-12T16:40:01+5:302020-07-12T16:41:02+5:30
दुपारी आढळला मृतदेह

चाळीसगावला खदानीत एकाची आत्महत्या
चाळीसगाव :धुळे - औरंगाबाद महामार्गालगत डेअराबर्डी भागातील खदानीत सुधाकर रामदास सोनवणे (वय ३८, आदर्श नगर) यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. रविवारी दुपारी एक वाजता त्यांचा मृतदेह खदानीत असलेल्या पाण्यात तरंगतांना आढळून आला.
सुधाकर हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई - वडील आहेत. त्यांची मानसिक स्थिती बरी नव्हती. सकाळी साडेनऊ वाजता ते घरातून बाहेर पडले. धान्यगोडाऊन समोरील खदानीच्या वरील भागात जाऊन बसले. काही वेळाने त्यांनी पाण्यात उडी मारल्याचे काही प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. त्यांना नोकरी नव्हती. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. नगरसेवक भगवान पाटील यांना हा प्रकार कळताच खदानीकडे धाव घेतली व पोलीस स्थानकात कळविले. तपास पो.नाईक प्रविण संगेले करीत आहे.