चोरीच्या दुचाकीसह एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:49+5:302021-01-08T04:47:49+5:30
जळगाव : मेहरूण परिसरातील जोशीवाडा येथील गोपाळ भगवान कोळी (वय ५०) याला चोरीच्या दुचाकीसह स्थानिक गुन्हे शाखेने ...

चोरीच्या दुचाकीसह एकाला अटक
जळगाव : मेहरूण परिसरातील जोशीवाडा येथील गोपाळ भगवान कोळी (वय ५०) याला चोरीच्या दुचाकीसह स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, गोपाळ यास एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी चोरून आणलेली दुचाकी जोशीवाडा येथील गोपाळ कोळी वापरत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. बकाले यांनी विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नितीन बाविकस्कर, राहुल पाटील, प्रितम पाटील अशांच्या पथकाला रवाना केले होते. संशयिताचा शोध घेत असताना तो, किनोद येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने यावल तालुक्यातील किनोद येथे जाऊन गोपाळ कोळी याला अटक केली. पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांना सोपवण्यात आले आहे.