भुसावळ येथे दरोड्यातील आरोपींपैकी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:16 IST2018-10-07T01:15:51+5:302018-10-07T01:16:27+5:30

भुसावळ येथे दरोड्यातील आरोपींपैकी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
भुसावळ : मुंबई येथून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने शहर पोलीस ठाण्याच्या कब्ब्जातील पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पो.कॉ.विनोद सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोईउद्दिन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ रोजी सायंकाळी घडली होती.
मुंबई येथून येथील सराफा बाजारासह इतर काही ठिकाणी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चार आरोपी १ रोजी आले होते. या वेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांना भरधाव वेगाने येणाऱ्या कारचा संशय आला. यानंतर त्यांनी या आरोपींचा खडका चौफुलीपासून पाठलाग केला होता. नाहाटा चौफुली गतिरोधकाजवळ अटक करण्यात पोलिसांनी यश आले होते. त्यावेळी एका आरोपीने पोलिसांना हत्याराचा धाक दाखवून धमकावले होते. हे चारही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. त्यातील मोईनुद्दीन शेख निजामुद्दीन (४०) रा.काजीवाडा साका नाकी, मुंबई याने भिंतीचे सिमेंटचे खापर तोडून हातावर मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.