कधीकाळी भव्य ऑईल मिल स्फोटानंतर झाली जळकी मिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:44+5:302021-02-05T06:00:44+5:30
पिंप्राळा रेल्वे गेट परिसरात असलेल्या अत्यंत जुन्या जळकी ऑईल मिल परिसराचा मोकळ्या भल्या मोठ्या भूखंडाचा सध्या शौचालयासाठी वापर होत ...

कधीकाळी भव्य ऑईल मिल स्फोटानंतर झाली जळकी मिल
पिंप्राळा रेल्वे गेट परिसरात असलेल्या अत्यंत जुन्या जळकी ऑईल मिल परिसराचा मोकळ्या भल्या मोठ्या भूखंडाचा सध्या शौचालयासाठी वापर होत आहे. या परिसराच्या अगदी जवळ रेल्वे रूळ असल्याने या ठिकाणी रेल्वेचे खांब अस्तावस्त पडलेले आहेत.
शौचालयासाठी वापर : परिसरात शनिवारी पाहणी केली असता हे चित्र समोर आले. याठिकाणी मिलचे एक गोडावून आहे. काही खोल्यांचे दरवाजे तुटले असून काहींना शटर लावलेले आहे. एक ट्रॅक्टर या परिसरात उभे होते. अनेक लोक या परिसरात शौचालयासाठी जात असल्याचे निदर्शनास आले.
पार्श्वभूमी : स्थानिकांकडून माहिती घेतली असता १९६१ मध्ये या ठिकाणी मोठा विस्फोट झाला होता. तेव्हापासून ही मिल उभीच राहू शकली नाही. आता हा परिसर भकास झाला आहे.
गुन्हेगारी : या ठिकाणचा वापर मद्यप्राशन, पत्ते, आदींसाठीही होतो. या ठिकाणी मागच्या वर्षी एक आत्महत्येची तर नुकतीच एक खुनाची घटना झाली होती.