Older ladies and sisters greeted by the Telugu Samaj Mahila Mandal at Jamner | जामनेर येथे तेली समाज महिला मंडळातर्फे वयोवृद्ध सुवासिनींचा सत्कार

जामनेर येथे तेली समाज महिला मंडळातर्फे वयोवृद्ध सुवासिनींचा सत्कार

ठळक मुद्देज्येष्ठांचे आशीर्वाद हिच सौभाग्याची खरी देणविरंगुळा म्हणून काही खेळही खेळण्यात आलेखेळामधील विजेत्यांना प्रतिभा चौधरी यांच्यातर्फे भेटवस्तू

जामनेर, जि.जळगाव : येथे तेली समाज महिला मंडळातर्फे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वयोवृध्द सुवासिनींचा सत्कार करण्यात आ्कला. यावेळी ज्येष्ठांचे आशीर्वाद हिच सौभाग्याची खरी देण असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या.
सध्याच्या काळात नौकरी किंवा व्यवसायासह अन्य कारणांमुळे विभक्त कुटुंंब पध्दती रूळली आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा सहवास दुर्लभ झाला आहे. एकत्र कुटुंंब पध्दतीतीत मिळणाऱ्या सुसंस्कारांना नवीन पिढी मुकली आहे. त्यामुळे केवळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम न करता येथील संताजी जगनाडे महाराज महिला मंडळातर्फे सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शोभाबाई राजाराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात गयाबाई चौधरी, भिकुबाई चौधरी, धनाबाई चौधरी, लीलाबाई चौधरी, सुलोचना चौधरी या पाच ज्येष्ठ सुवासिनींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नेहमीच्या दगदगीला फाटा देत विरंगुळा म्हणून काही खेळही खेळण्यात आले. खेळामधील विजेत्यांना प्रतिभा चौधरी यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.
सूत्रसंचालन मनीषा चौधरी, प्रास्ताविक प्रतिभा चौधरी, तर आभार प्रदर्शन प्रणाली चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाच्या सर्व महिलांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Older ladies and sisters greeted by the Telugu Samaj Mahila Mandal at Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.