वृद्ध महिलेचा झोपडीतच जळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:32 IST2017-08-25T00:31:48+5:302017-08-25T00:32:40+5:30

पारोळा : डास मारण्याच्या कॉईलमुळे आग

An old woman burnt to death in the hut | वृद्ध महिलेचा झोपडीतच जळून मृत्यू

वृद्ध महिलेचा झोपडीतच जळून मृत्यू

ठळक मुद्देपेट्रोल पंपा जवळीच होती झोपडीपोलिसांना घातपाताची शक्यतामहिलांनी पाहिल्यावर समजले

लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : बसस्थानकासमोर असलेल्या पेट्रोल पंपा जवळील झोपडीतील जिजाबाई पंडित सोनवणे (६५) या वृद्धेचा जळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. डास मारण्याच्या कॉईलमुळे आग लागली असावी अशी शक्यता वर्तविली आहे. घातपात झाला का? या दिशेनेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
जिजाबाई सोनवणे या ए.जी. कुळकर्णी पेट्रोल पंपामागे असलेल्या झोपडीत एकट्याच राहत होत्या. दुसºयांकडे धुणी-भांडी करून त्या स्वत:चा उदरनिर्वाह करीत होत्या. त्यांचा मुलगा अशोक सोनवणे हा गावातच राजीव गांधीनगरात राहतो. तो खासगी वाहनावर चालक असून, सध्या तो अजमेरला गेला आहे.
जिजाबाई सोनवणे या आज न दिसल्याने परिसरात राहणाºया मजूर महिलेने त्यांच्या झोपडीत बघितले असता त्यांचा खाटीवरच जळून मृत्यू झालेला होता. त्यांनी लागलीच ही माहिती रहिवाशांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, त्यांच्या खाटेशेजारी डासांची कॉईल लावली होती. त्यामुळे आग लागून वृद्धेचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. किरणबाई पारधी यांच्या खबरीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.
 

Web Title: An old woman burnt to death in the hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.