जुनी पेन्शन योजना शासन व कर्मचारी हिताची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST2021-07-02T04:11:56+5:302021-07-02T04:11:56+5:30
जुनी पेन्शन योजना लागू केल्यास फक्त सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांना तातडीने पेन्शन द्यावयाचे असल्याने व त्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या खूपच ...

जुनी पेन्शन योजना शासन व कर्मचारी हिताची
जुनी पेन्शन योजना लागू केल्यास फक्त सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांना तातडीने पेन्शन द्यावयाचे असल्याने व त्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याने शासनावर पुढील अनेक वर्षे जास्त वित्तीय भार येणार नाही.
अनेक कर्मचारी सेवानिवृत्त व मयत झालेले आहेत, त्यांची कोणतीही कपात झालेली नाही, अगर त्यांच्या नावावर काहीही शासन हिस्सा जमा झालेला नाही. पर्यायाने त्यांना अगर त्यांच्या कुटुंबीयांना कोणतेही आर्थिक संरक्षण मिळणार नाही.
या सर्व बाबींचा विचार करता संबंधित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची शिफारस आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री, तसेच कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव आल्यानंतर करावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जयंत चौधरी, गणेश गुरव, शेख रईस, शेख अशफाक, मलिक शाकीर, ललित चौधरी, विजय पाटील, बिपीन पाटील, प्रशांत चौधरी, विजय भालेराव, शांताराम नरेकर, शेख निसार, नितीन महाजन, शेख निसार, किरण शेलोडे, साबीर खान, शरीफखान, अजीम खान, शेख जमीर, मोहम्मद मुजीम यांच्यासह शिक्षक बांधव उपस्थित होते.