ट्रकच्या चाकाखाली येऊन वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:42 IST2020-12-11T04:42:16+5:302020-12-11T04:42:16+5:30

जळगाव : रिव्हर्स घेत असताना ट्रकच्या चाकाखाली येऊन गुलामे मुस्तफा (७०) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना सालारनगरातील मानस ...

The old man fell under the wheel of the truck and died | ट्रकच्या चाकाखाली येऊन वृद्ध ठार

ट्रकच्या चाकाखाली येऊन वृद्ध ठार

जळगाव : रिव्हर्स घेत असताना ट्रकच्या चाकाखाली येऊन गुलामे मुस्तफा (७०) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना सालारनगरातील मानस हॉटेलजवळ गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शरिफ खान अजीज खान पठाण यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सालारनगरातील हॉटेल मानसजवळ असलेल्या एका चहाच्या टपरीजवळ एमएच.१५.जी.४९४८ क्रमांकाच्या ट्रकवरील चालक हा रिव्हर्स घेत होता. ट्रक मागे घेत असताना अचानक मागे उभे असलेले गुलामे मुस्तफा यांनी धडक बसली आणि ते खाली पडून ट्रकच्या मागील चाकात आले. अपघात होताच जवळच उभे असलेले शरीफ खान अजीजखान पठाण, अब्दुल रईस यासह नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. नंतर वृद्धास लागलीच खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वृद्धास तपासणीअंति मृत घोषित केले. अखेर याप्रकरणी धडक देणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The old man fell under the wheel of the truck and died