शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिस बॉयने कंपनी मालकाला घातला ४७ लाखाचा गंडा, ११ जणांविरुध्द गुन्हा, चार जणांना अटक

By सुनील पाटील | Updated: October 20, 2022 21:18 IST

एमआयडीसीतील समृध्दी केमिकल्स व सुबोनियो केमिकल्स प्रा.लि.या कंपनीत हा प्रकार घडला आहे.

जळगाव: कंपनीशी संबंधित नसलेल्या लोकांच्या नावाने व्यवहार करुन ऑफीस बॉयने इतरांच्या मदतीने ४६ लाख ८७ हजार ७५२ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसीतील समृध्दी केमिकल्स व सुबोनियो केमिकल्स प्रा.लि.या कंपनीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ऑफिस बॉय विशाल पोपट डोके (रा.रामेश्वर कॉलनी), लतीफ कमरुद्दीन पिंजारी (रा.पिंप्राळा), प्रल्हाद सुनील माचरे व मयूर जमनादास बागडे(रा.जाखनी नगर) या चौघांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोध सुधाकर चौधरी (रा.सागर नगर) यांच्या मालकीची एमआयडीसीत समृध्दी केमिकल्स प्रा.लि. नावाची कंपनी आहे. विशाल डोके हा कंपनीत ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. त्याने सुबोध यांच्यासह त्यांचे बंधू सुनील चौधरी यांच्या सुबोनियो केमिकल्स प्रा.लि.या कंपनीशी व्यवहार नसलेल्या ६ ऑक्टोबर २०२१ ते १६ सप्टेबर २०२२ या कालावधीत वेळोवेळी बनावट बिल तयार करुन चौधरी बंधूंची बनावट सही करुन बँकामंधून धनादेश वटविले आहेत. दोन्ही भावांच्या कंपनीतून एकूण ४६ लाख ८७ हजार ७५२ रुपयांचा अपहार झाला आहे.या प्रकरणी विशाल पोपट डोके (रा.रामेश्वर कॉलनी), मेघा भूषण खैरनार (रा. खेडी),संजय मणीलाल छेडा (रा.गणेश कॉलनी), लतीफ कमरुद्दीन पिंजारी, ऋषीकेश रावसाहेब पाटील, अविनाश कोमल पाटील (रा.पिंप्राळा), पूनमचंद रामेश्वर पवार (रा.सिंधी कॉलनी),प्रल्हाद सुनील माचरे (रा.एमआयडीसी), विनोद प्रभाकर सोनवणे (रा.शाहू नगर),  मयूर जमनादास बागडे व विजय आनंदा सैंदाणे (रा.सुप्रीम कॉलनी) यांच्याविरुध्द अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या ११ जणांच्या नावाने धनादेश तयार करुन अपहार केला आहे.

चौघांना पोलीस कोठडीया संशयितांनी ऑनलाइन गेमसाठी या पैशाचा वापर केल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी संशयितांच्या अटकेसाठी पोलीस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, सुधीर साळवे, किशोर पाटील, मुदस्सस काझी, योगेश बारी, सतीश गर्जे, संदीप धनगर व साईनाथ मुंडे यांचे पथक नियुक्त केले. या पथकाने मुख्य सूत्रधारासह चौघांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्या.जे.एस.केळकर पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस