धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 20:55 IST2023-03-31T20:55:38+5:302023-03-31T20:55:42+5:30
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शुक्रवारी दुपारी एकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा
जळगाव :
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शुक्रवारी दुपारी एकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा व्हीडिओ गुरूवारी मध्यरात्री काही तरूणांच्या व्हॉट्सॲपवर आल्यानंतर त्यांनी शनिवारी संबंधित प्रकाराबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरूध्द धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह डीवायएसपी संदीप गावीत यांनी सुध्दा शहर पोलिस ठाण्यात येवून संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली.