शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गाळेधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आत्मदहनाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या १६ अव्यावसायिक मार्केटमधील १५०० गाळेधारकांनी मनपा प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात गेल्या पंधरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या १६ अव्यावसायिक मार्केटमधील १५०० गाळेधारकांनी मनपा प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात गेल्या पंधरा दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. गाळेधारकांचा पंधरा दिवसांपासून संप सुरू असतानादेखील मनपा प्रशासन गाळेधारकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने आता गाळेधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आत्मदहनासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. याबाबत बुधवारी गाळेधारक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, वसीम काझी, रमेश तलरेजा, हेमंत परदेशी, संजय अमृतकर, सुजित किनगे, रिजवान जागीरदार, प्रकाश गगनानी, शिरीष थोरात, शंकर रामचंदानी, राजेश समदाणी व गाळेधारक उपस्थित होते. बुधवारी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे यांच्या उपस्थितीत सर्व १६ अव्यावसायिक, अविकसित मार्केटचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत गाळेधारकांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

आता आत्मदहनाशिवाय कोणताही पर्याय नाही

गेल्या वर्षापासून सर्व व्यापारी कोरोनासारख्या महामारीला तोंड देत आहेत. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे साधारणतः १२० दिवस शहरातील व्यवसाय धंदे बंद होते व आताही तिच कोरोनाची परिस्थिती उद‌्भवलेली असताना मनपा प्रशासनाची मनमानी भूमिका बदललेली नाही. आमच्या कुवतीनुसार कर्ज काढून थोडे थोडे पैसे भरूनही आम्हाला आमचे गाळे परत मिळणार याची शाश्वती नाही. प्रचंड भय,तणाव व आर्थिक संकटात सापडलेला गाळेधारक लाखोंची बिले भरू शकणार नाही. परिवाराला दोन घास खाऊ घालता येईल की नाही या विवंचनेत असलेल्या गाळेधारकांना मनपा प्रशासन लाखो रुपयांच्या वसुलीसाठी धमकावत आहे. त्यामुळे आता आत्मदहनाशिवाय मार्ग राहिलेला नाही, अशी भूमिका गाळेधारकांनी बुधवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केली.

घर विक्री करूनही आम्ही मनपाची रक्कम भरू शकणार नाही

महानगरपालिकेकडून अन्यायकारक भाड्याची मागणी गाळेधारकांकडे केली जात आहे. इतकी रक्कम गाळेधारक आपले घरदार विकूनसुद्धा भरू शकत नाही, त्यामुळे महापालिका प्रशासनाने गाळेधारकांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, मनपा प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच कुटुंबासोबतच सर्व गाळेधारक आत्मदहन करतील, असा इशारादेखील गाळेधारक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील निवेदन देण्यात येणार असून, या काळात कोणतेही गाळेधारकांचे काहीही बरेवाईट झाल्यास किंवा कोणत्याही गाळेधारकाने आत्महत्या केली किंवा त्याचा जीव गेल्यास त्याला सर्वस्व महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असेही गाळेधारकांतर्फे सांगण्यात आले.