माता रमाई जयंतीनिमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST2021-02-09T04:18:52+5:302021-02-09T04:18:52+5:30

(०८सीटीआर २३) नशिराबाद : बौद्ध समाज पंच मंडळातर्फे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तथागत बुद्ध विहार येथे प्रतिमेस ...

On the occasion of Mata Ramai Jayanti | माता रमाई जयंतीनिमित्त

माता रमाई जयंतीनिमित्त

(०८सीटीआर २३)

नशिराबाद : बौद्ध समाज पंच मंडळातर्फे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तथागत बुद्ध विहार येथे प्रतिमेस माजी ग्रामपंचायत सदस्या कविता रंधे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी रमाईच्या जीवन व कार्य सांगितले. यावेळी रजाबाई सुरवाडे, आशाबाई सोनवणे , जया रंधे, संगीता रंधे, वंदना सुरवाडे, रेखा मगरे, सिंधुबाई सदावर्ते, चंद्रभागा सुरवाडे, प्रमिला सुरवाडे, कांताबाई रंधे, प्रियंका सावंत, जया सुरवाडे, शांताराम सोनवणे,सतीश सावळे, जितेंद्र सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचालन तुषार रंधे यांनी केले. आभार संजय सुरवाडे यांनी मानले.

सुनिल महाजन यांची निवड

(०९सीटीआर २४)

नशिराबाद : सुनील दगडू महाजन यांची महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच जळगाव येथील सहकार बोर्ड जिल्हा बैठकीत महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष शामराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली. यावेळी प्रदेश अध्यक्ष शालीग्राम मालकर, ज्ञानेश्वर महाजन, नलिन महाजन, प्रेरणा महाजन, माजी सरपंच विकास पाटील, भीमराव महाजन यांच्यासह एस.बी., आर.एस. ग्रुप व समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: On the occasion of Mata Ramai Jayanti