खडसेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; गुन्हा दाखल

By Admin | Updated: August 27, 2014 15:24 IST2014-08-27T15:24:04+5:302014-08-27T15:24:04+5:30

एकनाथ खडसे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून त्याला लाइक केल्याप्रकरणी मुंबई, पुणे, ठाणे येथील नऊ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Objectionable content about rocks; Filing a complaint | खडसेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; गुन्हा दाखल

खडसेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; गुन्हा दाखल

जळगाव : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आमदार एकनाथ खडसे यांच्याबाबत एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून त्याला लाइक केल्याप्रकरणी मुंबई, पुणे, ठाणे येथील नऊ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक अकाऊंटवर खडसे यांच्याबाबत आरोपी ई.जी.आर. कपिल, कोमार खान (रा.बीड), रवींद्र मावळेकर, रुद्र गबाळे (रा.पुणे), सुधीर कोरे (रा.पुणे), प्रवीण कदम (रा.अमळनेर) यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे लाडवंजारी यांना लक्षात आले. तर या पोस्टला आरोपी अर्जुन पाटील (रा.ठाणे), संदेश भोळे (रा.पिंपळनेर), अनिकेत ठाकूर (रा.पनवेल) यांनी लाइक केल्याचेही त्यांच्या लक्षात आले. माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Objectionable content about rocks; Filing a complaint