महिनाभरात ओबीसीची जनगणना करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST2021-06-18T04:13:13+5:302021-06-18T04:13:13+5:30
एरंडोल : एरंडोल तालुका तेली समाजातर्फे तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना ...

महिनाभरात ओबीसीची जनगणना करावी
एरंडोल : एरंडोल तालुका तेली समाजातर्फे तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी व जनसंख्येनुसार आरक्षणाचा कायदा करून ओबीसींना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एक महिन्याच्या आत ओबीसींची जनगणना करावी, ओबीसी जनगणनेनुसार आरक्षणाचा कायदा राज्य व केंद्र सरकारने त्वरित मंजूर करावा, तेली समाजासाठी माागासवर्गीयांना मिळणाऱ्या सवलती लागू कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना तेली समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष आनंदा चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी या उपक्रमाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी गुलाब चौधरी, सचिव आर. डी. चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक नितीन चौधरी, समाधान चौधरी, नथ्थू चौधरी, दिनेश चौधरी, कैलास चौधरी, दीपक चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, विलास पाटील, सुनील चौधरी, रामदास चौधरी, मंगेश चौधरी उपस्थित होते.