पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.अ.येथे विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 23:06 IST2020-06-09T13:35:25+5:302020-06-09T23:06:15+5:30

पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.अ. येथे विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला.

The number of corona victims in Faizpur has reached ten | पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.अ.येथे विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.अ.येथे विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू


पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील मुंदाणे प्र. अ. येथे २५ वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडेआठला ही घटना घडली.
मुंदाणे प्र. अ. येथील सुनंदाबाई संतोष मोरे (वय २५) ही महिला ८ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पिण्याच्या पाण्याचे नळ आले, तेव्हा पाण्याची मोटर लावत होती. तेव्हा अचानक विजेचा जोरदार शॉक लागल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ पारोळा येथे कुटीर रुग्णालयात दाखल केले असता मृत्यू झाला. याबाबत ९ रोजी पारोळा पोलिसात उत्तम वामन मोरे यांनी खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.कॉ. सुधीर चौधरी करीत आहे.

Web Title: The number of corona victims in Faizpur has reached ten