आता पारोळ्यात शून्य रुग्ण संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:19+5:302021-07-28T04:17:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग हळू हळू सर्वत्र कमी होत आहे. बोदवड, एरंडोल पाठोपाठ आता पारोळा तालुक्यात ...

आता पारोळ्यात शून्य रुग्ण संख्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग हळू हळू सर्वत्र कमी होत आहे. बोदवड, एरंडोल पाठोपाठ आता पारोळा तालुक्यात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. दोन्ही लाटांमध्ये तीन तालुक्यात कोरोनाला शून्यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यात मंगळवारी ९ बाधित आढळून आले असून १२ जण बरे झाले आहेत.
चाळीसगावात सर्वाधित ७ रुग्ण आढळून आले आहेत. अमळेनर आणि मुक्ताईनगरला प्रत्येकी एक रुग्ण समोर आला आहे. जळगाव शहरात मंगळवारी एकही बाधित आढळून आलेला नाही. एक रुग्ण बरा झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १५ वर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून बोदवडमध्ये एकही रुग्ण नसून एरंडोलमध्ये हा दिलासा कायम आहे. त्यापाठोपाठ आता पारोळ्याचा एकमेव रुग्ण बरा झाल्याने पारोळा तालुक्यालाही दिलासा मिळाला आहे. पाचोरा आणि भडगाव येथेही प्रत्येकी एकच सक्रिय असून यांचीही शून्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.
रुग्णसंख्येत काहीशी वाढ
गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्येत पाच रुग्णांची वाढ नोंदविण्यात आली आहे. यात शनिवारी ३, रविवारी ४, सोमवारी ४ आणि मंगळवारी ९ रुग्ण समोर आले आहेत. यात आरटीपीसीआरच्या १४३४ अहवालांमध्ये ४ तर ॲन्टीजनच्या २६६०६ तपासण्यांमध्ये ५ बाधित आढळून आले आहेत.