शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

निवृत्त शिक्षकांबाबत अनास्था का....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:43 PM

गेली कित्येक वर्षे जळगाव मनपा अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांच्या बाबतीत अन्याय सुरू आहेत. ८-१० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन विक्रीची ...

गेली कित्येक वर्षे जळगाव मनपा अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांच्या बाबतीत अन्याय सुरू आहेत. ८-१० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन विक्रीची मंजुरी मिळाली नाही. मनपाच्या इतर कर्मचाऱ्यांबाबतीत ही वस्तुस्थिती नाही. मग मनपा शिक्षण मंडळाबाबतीत असे का ?गेला काही वर्षे निवृत्त शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाबाबतही बेपर्वाईचे धोरण अवलंबविले जात आहे. कहर म्हणजे २०१६ चे पेन्शनचे दोन हप्ते अजून अदा केले गेले नाही. २०१९ मध्ये केवळ जानेवारीचे निवृत्ती वेतन अदा केले आहे. काही वर्षांपूर्वी मनपा शिक्षण संघटनेने उच्च न्यायालयात या अनुषंगाने केस ही दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही निवृत्ती वेतनाचे रडगाणे संपलेले नाही. महागाईच्या या काळात, पेन्शन प्रत्येक निवृत्त वेतनधारकांना आधार वाटते. पण तोच आधार प्रशासनाकडून हिसकावला जात आहे. मनपा निवडणुकीनंतर, नव्या राजकर्त्यांकडून खूप काही अपेक्षा होत्या. जळगाव ते मुंबई एकच पक्षाचे सरकार असल्याने निवृत्त शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत होत्या. पण आता वाटते की, मंझिल अभी दूर है. निवृत्त शिक्षकांच्या अनेक गरजा, अडीअडचणी असतात. आधीच निवृत्तीनंतर शिक्षकांना १०-१० वर्षे, पेन्शन विक्रीच्या रकमा मिळाल्या नाहीत. काहींनी न्यायालयाच्या मार्गाने रकमा मिळविल्या अजून अनेकांना पेन्शन विक्री मिळाली नाही. हा अन्याय नव्हे काय ? तरी आयुक्तांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासह सहकार्याचा हात पुढे करावा व त्यांना उर्वरित जीवन समाधानात जगण्यासाठी मदत करावी.-रशीद शेख कासमी, अमन पार्क, शिवाजीनगर, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव