शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

अ-अभिनयाचा अ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:29 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वेध नाटकाचा’ या सदरात नाट्यकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी लिहिताहेत....

नाटक हा विषयच जणू एखाद्या अथांग सागरासारखा आहे. त्यात जितकी बुडी माराल, तितके खोलवर जाल तितके मौल्यवान विचाराने मौक्तिक गवसतील. मग नाट्यलेखन असो, अभिनय असो, दिग्दर्शन असो किंवा तंत्र असो असे अनेक विषय ज्याचे नाटक वर्चस्व आहे त्यांना सतत मोहात टाकतात व त्याच्या सान्निध्यात स्वर्गीय सुखाचा आनंद देतात.आपण लहान असताना सर्वप्रथम जी मुळाक्षरं शिकलो त्यातलं पहिलं अक्षर असतं ते अ. अ या अक्षरापासून सुरूवात होते. तसंच नाटक प्रत्यक्ष कृतीत येताना अभिनय ही पहिली पायरी असते. नाटककाराचे शब्द आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी नटाला करावा लागतो तो अभिनय. खरं तर अभिनय ही करण्याची गोष्ट नाही. अभिनय हा करावा लागत नाही. तो होत असतो. नटाची देहबोली, नटाचा आवाज, त्याच्या वाट्याला आलेले संवाद यांच्या मदतीने जे काही नट करतो त्या कृतीचा परिपाक म्हणून त्या नटाच्या चेहऱ्यावर जे काही उमटतं ज्याला नाटकिय परिभाषेत मुद्राभिनय असे म्हणतात तर असा मुद्रेसहित जे काही प्रेक्षक अनुभवतो त्याला अभिनय म्हणता येईल.माणूस हा जन्मजात नट आहे. जगण्यात त्याला पदोपदी या अभिनयाचा सहारा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या घ्यावा लागतो. कधी खºयासाठी तर कधी खोट्यासाठी तो अभिनयाचा वापर मोठ्या कौशल्याने करीत असतो. त्याला आपल्या या उपजत असलेल्या गुणांची कदाचित जाणिव नसते.पण ज्याला नट व्हायचं आहे त्याला ती होते आणि मग तो त्या अभिनयाचा रियाज करू लागतो.नाटकाच्या शास्त्रात अभिनय करणाºया नटाला अ‍ॅथलिटची उपमा दिलेली आहे. एखाद्या अ‍ॅथलिटसारखे चपळ, सजग, उत्स्फूर्त हालचाली करणारे शरीर असलेली व्यक्ती नट होण्यास योग्य आहे. किंबहुना नटाचे तसे असले पाहिजे असे म्हटले आहे. गायकाला संगीताचा अभ्यास करताना आपल्या आवाजासाठी रियाज करावा लागतो. संगीतातले प्राथमिक स्वर अभ्यासताना आवाजाचा स्तर शोधाव लागतो. त्याला खालच्या आवाजात गाता आलं पाहिजे तसच त्याला वरच्या सूर पकडता आला पाहिजे. जस गाण्याचं आहे तसंच अभियनाच आहे. नटाचा आवाज हा संगीतातल्या प्रमाणे तीन ही सप्रकात सफाईने आणि ताकदीने सहजगत्या फिरला पाहिजे. त्यासोबत शब्दांचे उच्चार, भाषेचा अभ्यास, स्वरांचे आरोह अवरोह असे अनेक प्रकारचे परिमाणं लावत त्याच्या वाचेचा अर्थात वाचिक अभिनयाचा रियाज होतो. अभिनय ही एकट्याने करण्याची जशी गोष्ट आहे तशी दुसºयासोबत सुद्धा तो करावा लागतो. अभियनात स्वत: करणे हे जसे महत्वाचे असते तसे समोरचा दुसरा जे काही करतो त्याला रिस्पॉण्ड करणे तितकेच महत्वाचे असते. समोरचा बोलत आहे व मी ते ऐकतो आहे हे ऐकणं फार महत्वाचे आहे. हा अ‍ॅक्शन रिअ‍ॅक्शनचा खेळ अभियनात फार महत्वाचा ठरतो. गाण्यात ताल, लयीला जितके अनन्यसाधारण महत्व आहे तितकेच अभिनयात पण आहे. तोल सुटलेल्या दारुड्याचा अभिनय करताना सुद्धा त्याचा ताल व लय संभाळणे महत्वाचे आहे. तरच ती भूमिका संस्मरणीय ठरते. साधं बोलणं जर ताल लयीला जर सोडून असेल ते एकायला त्रासदायक होतं. असा प्रत्येकाचा अनुभव आहे. एखादा कीर्तनकाराचे निरुपण का आवडते तर ते बुवा गाणं गोड गातात म्हणून नाही तर त्यांचे बोलणे हे अत्यंत तालात व लयीत असते म्हणून भाषेचा वापर, आवाजातील चढउतार, भावनेचा परिपोष यामुळे बुवांच कीर्तन, प्रवचन हे रसाळ होतं. तसचं नटाचं बोलणं हे ऐकावयास वाटलं पाहिजे, मग तो भूमिका कोणतीही असो. तो जे काही संवाद म्हणेल व त्या सोबत जी काही भूमिकेबरहुकूम हालचाली करेल त्या संयुक्तिक वाटतील.अभिनय कला ही उपजत असते किंवा नट हा जन्माला यावा लागतो हा अत्यंत पुरातन असा वाद आहे व तो आजही सुरू आहे. कोणतीही कला ही अथक व योग्य दिशेने जर प्रयत्न केले तर साध्य होते. अभिनय हा केवळ शब्द, हालचालीत नसतो. त्यासाठी आंतरीक तयारी महत्वाची असते. भूमिकेचा केलेला अभ्यास, विचार, त्यावर केलेले वाचन, चिंतन मनन या सगळ्यावरच त्याच्या भूमिकेची उंची ठरत असते. जितका विचार खोल तितकी त्या भूमिकेची उंची वाढत जाते.-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव