शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

नमोकार मंत्र औपचारीकता नव्हे, त्यातून उपचार शक्य - मानसी जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:40 PM

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सावादरम्यान ‘जैन शास्त्राचा जीवनावर असलेला प्रभाव’ विषयावर व्याख्यान

ठळक मुद्देनमोकार मंत्राने दुमदुमले सभागृहविजय प्राप्तीसाठी मंत्र, स्तोत्राचा पाठ करा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३० - जैन धर्मियांचा सर्वात महान मंत्र असलेला नमोकार महामंत्र मेंदू शांत ठेवण्याचे काम करणारा असून हा मंत्र स्वीत्झलॅण्डमध्ये विश्वशांती निर्माण करणारा मंत्र ठरला आहे. मात्र आपल्याकडे आपण केवळ जयंती उत्सवादरम्यान नमोकार मंत्राची औपचारीकता पूर्ण करतो. नमोकार मंत्र औपचारीकता नसून हा मंत्र उपचार करण्याचे काम करतो, असे स्पष्ट मत शारीरिक, मानसिक, आरोग्यवर्धक जैन सिध्दांताच्या विश्लेषक मानसी जे. जैन (अंकलेश्वर) यांनी महावीर जयंतीच्या निमित्ताने व्यक्त केले.पाच दिवसीय भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवांतर्गत गुरुवारी सकाळी बालगंधर्व सभागृहात ‘जैन शास्त्राचा जीवनावर असलेला प्रभाव’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी खासदार ईश्वरलाल जैन होते. या वेळी संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष भागचंद जैन, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेचे अध्यक्ष मनोज सुराणा, श्री महावीर दिगंबर जिनचैत्यालय ट्रस्टचे अध्यक्ष राजेश जैन, प्रमुख वक्त्या मानसी जैन, समिती प्रमुख दिलीप गांधी यांच्यासह गौतम प्रसादी नवकारसीचे लाभार्थी गिरधारीलाल ओसवाल मंचावर उपस्थित होते.मान्यवरांच्याहस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन मीनू छाजेड, कविता टाटिया, स्वाती जैन यांनी सादर केलेल्या श्रवणीय मंगलाचरणने कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच निकिता रेदासनी, खुशबू सुराणा, श्रद्धा बोरा, शिवानी कावडिया, डिंपल श्रीश्रीमाळ या मुलींनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविकात समिती प्रमुख दिलीप गांधी यांनी मंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.‘सदाज्ञान भक्तीगान’चे प्रकाशनभारती रायसोनी लिखित ‘सदाज्ञान भक्तीगान’ या पुस्तकाचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.देहदान करणाºया व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सत्कारदेहदानाविषयी समाजात जागृती वाढावी यासाठी जैन समाजातील देहदान करणाºया व्यक्तींच्या कुटुंबीयांचा यावेळी सत्कार करण्यात येऊन या चळवळीस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न समितीच्यावतीने करण्यात येत आहे. यामध्ये जयकुमार लुणिया, अजय शहा, कौशल्याबाई रेदासनी, चंद्रप्रकाश सांखला, सुरेश ललवाणी (जामनेर, हा सत्कार ईश्वरलाल जैन यांनी स्वीकारला) यांचा सत्कार करण्यात आला.ओसवाल परिवाचा सत्कारगौतम प्रसादीचे लाभार्थी गिरधारीलाल ओसवाल व कुटुंबीयांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.तरुणाई ही संकल्पना घेऊन साजरा होत असलेल्या जन्मकल्याणक मोह्तसावातील यासोहळ््याचेसूत्रसंचालन नितीनचोपडा,तन्वीमल्हारायांनीकेले.नमोकार मंत्राने दुमदुमले सभागृहमानसी जैन यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या सुरुवातीलाच सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य यांचा उल्लेख करून हे जैन धर्मातील तीन रत्न असून ते आचरणात आणण्याचे आवाहन केले. पुढे मानवी जीवनावर प्रभावकारी ठरणारा नमोकार मंत्र तालबद्ध रित्या म्हटल्यास त्याच्या प्रभावाचे महत्त्व सांगून त्यांनी हा मंत्र प्रेमाने म्हणा, असे आवाहन केले. या वेळी मानसी जैन यांच्यासह समस्त समाज बांधवांनी एकत्र म्हटलेल्या नमोकार मंत्राने बालगंधर्व सभागृह दुमदुमून गेले होते. मानसी जैन यांनी पंचपरमेष्टी मुद्रेचेही महत्त्व विषद केले.विजय प्राप्तीसाठी मंत्र, स्तोत्राचा पाठ कराआपल्या जीवनाचा उद्देश काय, मी कोण आहे हे ओळखण्यासाठी तीर्थंकरांनी तपश्चर्या केली. आपण केवळ देवाला खूष करण्यासाठी मंत्र, स्तोत्र, सामायिक करू नका. जीवनात विजय मिळवायचा असेल तर त्यांचा पाठ करा असे सांगत केवळ आयोजन नको, प्रयोजन करा, असे आवाहन करून त्यांनी विदेशात त्याचे वाढते महत्त्वही या वेळी सांगितले.आत्मापासून काम करण्याचा संकल्प कराकेवळ शरीराला महत्त्व नसून आत्म्याला महत्त्व द्या असे सांगून भौतिक जगतात आत्मा कसा शुद्ध ठेवायचा याचा विचार सर्वांनी केला पाहिजे, असे मानसी जैन यांनी सांगितले. आपण जी भक्ती करतो ती परिपूर्ण आहे का, याचा विचार करा असे सांगून त्यांनी देवाला फूल असो वा इतर काहीही अर्पण केले तरी ते परिपूर्ण कसे नाही, याचे उदाहरणे दिली. याचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्यांनी ‘क्या चढाऊ तुझे भगवंत, ये निर्धन का डेरा है....’ हे गीत सादर करून आजच्या जन्मकल्याणक महोत्सवापासून जे काही करू ते आत्यापासून होईल, असा संकल्प करा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी त्यांनी विविध मंत्रोच्चारातून जीवनातील विविध प्रसंगाचे वर्णन केले.आध्यात्मिक, वैज्ञानिक मनुष्य निर्माण होण्याची गरजआपण दररोज जय जिनेंद्र म्हणतो, मात्र आपण पंच इंद्रियांवर नियंत्रण मिळविले आहे का, असा सवाल त्यांनी केला.जळगावचे कौतुकदेशात इतर ठिकाणी जैन धर्म पंथांमध्ये विखुरला असताना जळगावात मात्र सर्व पंथीय एक असून समाजासाठी ही एकता खूप मोठी आहे. याचा आपल्याला आनंद आहे, असे सांगत मानसी जैन यांनी जळगावचे कौतुक केले.भव्य स्थानक लवकरचआपल्या अध्यक्षीय भाषणात ईश्वरलाल जैन यांनी जळगावात सकल जैन समाजाने निर्माण केलेली एकता अशीच टिकवून ठेवू व देशभरात जळगावचे नाव ओळखले जाण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. या सोबतच जैन धर्मियांचे भव्य स्थानक लवकरच उभारले जाईल, अशीही ग्वाही दिली.अर्चना गांधी यांनी आभार मानले.जन्मकल्याणक महोत्सवासाठी मंडळाचे माजी अध्यक्ष रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, प्रवीण छाजेड, आनंद चांदीवाल, मनोज लोढा, प्रणव मेहता, जितू जैन, संजय रेदासनी, महेश मुणोत, विपीन चोरडिया, अनुप ताथेड, नीलेश जैन आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८Jalgaonजळगाव